मुंबई : रेनॉल्ट 'डस्टर' कारचं नवं मॉडेल आणलं आहे. या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ही कार आंतरराष्ट्रीय बाजारात 2018मध्ये लाँच करण्यात येणार आहे. या कारची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, मारुती एस-क्रॉस आणि फोर्ड इकोस्पोर्ट या कारशी असणार आहे.


नव्या डस्टरच्या डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात आले असून ती डासिया कंपनीच्या डस्टर सारखीच दिसते. रेनॉल्ट डस्टरची विक्री भारत, रशिया आणि ब्राझीलसह अनेक देशात करतं.

या कारचा लूक ग्राहकांना आकर्षित करेल असेल कपंनीला विश्वास आहे. त्यामुळे या कारला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

डस्टर कारला भारतात बरीच पसंती आहे. त्यामुळे रेनॉल्टनं नव्यानं ही कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात नवी डस्टर कार कधी लाँछ होईल याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही. रेनॉल्ट नुकतीच कॅप्चर एसयूव्ही भारतात लाँच केली आहे. त्यामुळे रेनॉल्ट नवी डस्टर भारतात 2019 पर्यंत लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com