मुंबई : जीएसटी लागू झाल्यानंतर टाटा, होंडा यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतींमध्ये कपात केली आहे. फ्रेंच कार कंपनी 'रेनॉल्ट'नेही आपल्या गाड्यांच्या किंमतीत 7 टक्क्यांनी घट केली असल्याने ग्राहकांना आता रेनॉल्टच्या गाड्या 5 हजार 200 ते 1 लाख 4 हजार रुपयांपर्यंत सवलतीत मिळतील.

कुठल्या कारमध्ये किती कपात?

  • क्वीड क्लायम्बर एएमटी - 5,200 ते 29,500 रु.

  • एसयूव्ही डस्टर RXZ AWD - 30,400 ते 1,04,700 रु.

  • लॉजी स्टेपवे RXZ - 25,700 ते 88.600 रु.


जीएसटी करप्रणालीचा फायदा ग्राहकांना देण्याचं आम्ही ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचलक सुमन सावनी यांनी सांगतले.

दरम्यान, कालच टाटा मोटर्स आणि होंडा या दोन कंपन्यांनी जीएसटीचा फायदा आपापल्या ग्राहकांना देण्याचं ठरवत किंमती स्वस्त केल्या. त्यानंतर आता रेनॉल्ट कंपनीनेही गाड्यांच्या किंमती कमी केल्या आहेत.