रिलायन्स जिओ अजूनही परदेशी कंपन्यांसोबत कॉलचा तपशील शेअर करत आहे. एक वर्ष झालं पण काहीच बदललेलं नाही, असं अॅनॉनिमसने Tumblr अकाऊंटवर म्हटलं आहे. या पोस्टमध्ये एका जुन्या लिंकचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये मागच्या वर्षी रिलायन्स जिओ यूझर्सची माहिती चीनसोबत शेअर करत आहे, असा दावा अॅनॉनिमसने केला आहे.
रिलायन्स ही माहिती जाहिरात कंपन्यांना विकत आहे, असा दावा अॅनॉनिमसने केला आहे. My Jio आणि Jio डायलर अॅप Mad-me या जाहिरात कंपनीसोबत डाटा शेअर करत असल्याचंही अॅनॉनिमसने म्हटलं आहे.
रिलायन्सकडून आरोपांचं खंडण
दरम्यान रिलायन्सने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ग्राहकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे, असं स्पष्टीकरण रिलायन्सने दिलं आहे. रिलायन्सकडून ग्राहकांचा डाटा फक्त अंतर्गत विश्लेषणासाठीच वापरला जातो असं, रिलायन्सने स्पष्ट केलं आहे. मात्र रिलायन्स जिओ चाट अॅपचं सर्व्हर चीनमध्ये आहे आणि डाटाही चीनमध्ये शेअर केला जातो, असा आरोप याच ग्रुपने मागच्या वर्षी केला होता.