मुंबई : गूगलचा आज वाढदिवस. गूगल आज 18 वर्षांचं झालं आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने गूगल प्रौढ झालं आहे. या निमित्ताने गूगलने एक खास डूडल तयार केलं आहे.


गूगलच्या वयावरुन वाद

गूगलच्या वाढदिवसावरुन सुरु असलेल्या वादाला आज पूर्ण विराम मिळणार आहे. 1998 साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. मात्र, तरीही तारखेवरुन कायमच वाद झाला. त्यानंतर गेल्या 27 सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्या हिशोबाने आज गूगलचा 18 वाढदिवस आहे.

गूगलचा इतिहास काय?

4 सप्टेंबर 1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली.

गूगलची स्पेलिंग मिस्टेक

तुम्हाला माहित आहे का, गूगलच्या स्पेलिंग मिस्टेकमागील किस्सा? खरंतर आताच्या 'Google'चं नाव ठेवायचं होतं 'Googol'. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे 'Google' असं झालं आणि तेच नाव पुढे प्रसिद्ध झालं आणि आज तर इंटरनेट सर्च इंजिनचं जायंट म्हणून गूगलकडे पाहिलं जातं. बरं त्याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव 'बॅकरब' असं ठेवलेलं. मात्र, त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले.



डोमेन रिजस्ट्रेशन आणि डूडलची सुरुवात

1997 साली कंपनीने डोमेन रजिस्टर केलं आणि अधिकृतपणे 'गूगल' असे नाव ठेवण्यात आले. 2002 साली गूगलने पहिल्यांदा डूडल तयार केलं. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गूगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करतं.

 

गूगल..... द जायंट!

गूगल जगभरात प्रसिद्ध असलेलं सर्च इंजिन आहे. प्रत्येक विषयांवरील माहिती, संदर्भ इथे अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. सुरुवातील असं होतं की, फक्त दुसऱ्या वेबसाईट्सचे डिटेल्स पुरवल्या जातील. मात्र, या कंपनीने या विचारात बदल करुन असं प्लॅटफॉर्म बनवण्याचं ठरवलं की, जगभरातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. एका क्लिकवर सर्व काही.