मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 833 काॅलेजना रिलायन्स जिओ मोफत वायफाय सेवा पुरवणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि रिलायन्स जिओमध्ये याबाबत करार झाला आहे.

या करारामुळे 833 काॅलेजच्या आणि काही संशोधन केंद्रातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना 20 Mbps या स्पीडने मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे.

विद्यापीठाने कॅशलेसकडं वळण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. कारण विद्यार्थ्यांना मोफत वायफायद्वारे काॅलेज फी, कँटीन कुपन आणि आॅनलाईन स्टेशनरी खरेदी करता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात म्हणजे 28 डिसेंबर पर्यंत 500 काॅलेजमध्ये मोफत वायफाय उपलब्ध होईल, तर उरलेल्या काॅलेजमध्ये जानेवारी अखेरपर्यंत मोफत वायफाय सेवा मिळेल.