नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या मोफत सेवेला 'हॅप्पी न्यू ईयर ऑफर'च्या माध्यमातून मार्चपर्यंत वाढवल्याने आता भारती एयरटेलनेही आज दोन नवे प्लॅन लॉन्च केले. या नव्या प्लॅननुसार 4G डेटासोबत अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल मिळणार आहेत. यामध्ये 145 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.


एयरटेलच्या 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबी 4G डेटासोबत एयरटेल ते एयरटेल मोफत लोकल-एसटीडी कॉलची सुविधा मिळेल. 345 रुपयांच्या प्लॅनमध्ये देशात कुठल्याही नेटवर्कवर मोफत लोकल-एसटीडी कॉलसोबत 1 जीबी 4G डेटा मिळेल. दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल आणि देशभरातील एयरटेलच्या ग्रहाकांसाठी हे प्लॅन उपलब्ध असेल.

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने 4G सेवा सुरु केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात तब्बल 5.2 कोटी ग्राहक बनवले. कंपनीने जिओची सुविधा 31 मार्च 2017 पर्यंत वाढवली असल्याने अनेकांचा जिओकडे ओढा आहे.