मुंबई: वर्षाअखेरीस जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ह्युंदाई मोटर्सनं 'डिसेंबर डिलाईट' ही नवी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ह्युंदाई काही निवडक कारवर दोन लाखांपर्यंत सूट देत आहे.

इयॉन:


ह्युंदाईची एंट्री लेव्हल कार इयॉनवर तब्बल 60,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये 55,000 रुपये सूट असून सरकारी कर्मचाऱ्यांना 5000 रुपये अधिक सूट आहे.

आय-10 वर 53,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यामध्ये 48000 रुपयांपर्यंत सूट असून सरकारी कर्मचाऱ्यांना 5000 रुपये अधिक सूट आहे.



ग्रँण्ड आय-10वर 20000 रुपयांपर्यत सूट मिळणार असून 20000 पर्यंत एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयाचा लॉयल्टी बोनसही मिळणार आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांना 7000 रुपये अधिक सूट आहे.



एक्सेंटच्या पेट्रोल व्हेरिएंटवर एकूण 52,000 रुपयांची सूट मिळणार आहे. यात 25000 रुपये सूट असून 20000 पर्यंत एक्सचेंज बोनस आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांना 7000 रुपये अधिक सूट आहे.
एक्सेंटच्या डिझेल व्हेरिएंटवर 15000 पर्यंत सूट असणार आहे.



एलीट आय-20च्या सर्व व्हेरिएंटवर 35,000 रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. यामध्ये 15,000 पर्यंत थेट सूट मिळणार असून 20,000 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळणार आहे.



व्हेरनाच्या बेस व्हेरिएंट (पेट्रोल)वर 30000 रुपये कॅश डिस्काउंट आणि 50000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 10000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस मिळणार आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांना 10000 रुपये अधिक सूट आहे.



सेंटा-फे वर दोन लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे. यामध्ये एक लाखापर्यंत कॅश डिस्काउंट आणि १ लाख रुपये एक्सचेंज बोनस आहे.