मुंबई: मोबाइल कंपनी असुस इंडियानं आपल्या यूजर्ससाठी रिलायन्स जिओसोबत भागीदारी केली आहे. आसुस इंडियाच्या या भागीदारीमुळे आता यूजर्सला जास्तीचा डेटा मिळणार आहे. 16 जूननंतर ज्यांनी असुसचा स्मार्टफोन खरेदी केला आहे त्यांना जिओच्या 'एक्स्ट्रा डेटा'चा फायदा मिळणार आहे.

या ऑफरमध्ये असुसच्या स्मार्टफोन यूजर्सला तब्बल 100 जीबी एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. पण हा एक्स्ट्रा डेटा 3 ग्रुपमध्ये विभागण्यात आला आहे.

पहिल्या ग्रुपमध्ये असुस जेनफोन सेल्फी, जेनफोन मॅक्स, जेनफोन लाईव्ह आणि जेनफोन गो स्मार्टफोन्सवर 309 किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर 3GB एक्स्ट्रा डेटा मिळेल. पण 10 रिचार्जपेक्षा जास्त रिचार्जवर एक्स्ट्रा डेटाचा लाभ मिळणार नाही.

दुसऱ्या ग्रुपमध्ये आसुस जेनफोन 2, जेनफोन 2 लेझर, जेनफोन 3S मॅक्स आणि जेनफोन 3 मॅक्स हे स्मार्टफोन असणार आहे. या ग्रुपमध्ये जिओच्या सिमवर 309 रुपयाच्या रिचार्जवर 5GB एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे.

तिसऱ्या ग्रुपमध्ये असुस स्मार्टफोन यूजर्सला 10 GB डेटा मिळणार आहे. या ग्रुपमध्ये असुस जेनफोन झूम, जेनफोन 3 डीलक्स, जेनफोन 3 अल्ट्रा आणि जेनफोन 3 हे स्मार्टफोन आहेत.

या सर्व स्मार्टफोनमध्ये 10 रिजार्जवर यूजर्सला एक्स्ट्र डेटा मिळणार आहे.

अशी मिळवा ऑफर

ही ऑफर मिळवण्यासाठी सर्वात आधी यूजरला आपल्या असुस स्मार्टफोनवर माय जिओ अॅप इंस्टॉल करावा लागणार आहे. यानंतर यूजर्सला माय वाउचरचा ऑप्शन ओपन करावा लागेल. यानंतर यूजरला व्हीयू वाउचरच्या माध्यमातून एक्स्ट्रा डेटा मिळवू शकता.

या ऑफरमध्ये मिळणारा डेटा हा 48 तासात अॅक्टिव्हेट होईल. तसेच ही ऑफर मिळवणाऱ्या यूजर्सला जिओच्या दुसऱ्या ऑफर मात्र मिळणार नाही.

संबंधित बातम्या:

या महिन्यात जिओची ऑफर संपणार, पुढं काय?

रिलायन्स जिओच्या नव्या 4G स्मार्टफोनची किंमत फक्त 500 रुपये?

रिलायन्स जिओची नवी ऑफर, 509 रुपयात तब्बल 224GB डेटा!

'जिओ'च्या 12 कोटी यूझर्सचा डेटा हॅक?