मुंबई : ऑनलाईन मार्केटप्लेस असलेल्या अमेझॉननं आज 10 जुलै रोजी आपला प्राईम डे जाहीर केला आहे. ग्राहकांना आज सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुढील 30 तास जवळपास 1 लाख प्रॉडक्ट्सवर ऑफर्स दिल्या जाणार आहेत. यात स्मार्टफोन्स, अमेझॉन फायर टीव्ही स्टिक, फिटबिट ट्रॅकर, आणि फॅशन प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट दिली जाणार आहे.
अमेझॉनच्या प्राईम डे सेलमध्ये जास्तीत जास्त शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढला जाईल. भाग्यवान ग्राहकांना आकर्षक बक्षीसंही दिली जाणार आहेत. अमेझॉननं आपलं वॉलेटही लॉन्च केलं आहे. ज्यात पैसे अड केल्यास त्यावरही 20 टक्के कॅशबॅक देऊ केला आहे. तसंच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरही 15 टक्के कॅशबॅक ग्राहक मिळवू शकतील.
अमेझॉनचा प्राईम डे सेल आज 10 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरु होईल. हा सेल उद्या 11 जुलै रोजी रात्री 11.59 पर्यंत सुरु असेल. केवळ प्राईम मेंबरनाच या सेलचा लाभ घेता येईल. ज्या ग्राहकांना या सेलचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना पेड प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे.
काय आहे प्राईम मेंबरशिप?
अमेझॉननं आपली प्राईम मेंबरशिप मागच्या वर्षी लॉन्च केली आहे. यात 499 वार्षिक फी देऊन ग्राहक अमेझॉनची प्राईम मेंबरशिप घेऊ शकतात. प्राईम मेंबरना 1 वर्षासाठी मोफत वन डे डिलिव्हरी, अनलिमिटेड डिलिव्हरी, अनलिमिटेड प्राईम व्हिडिओ या सुविधा मिळतात.