या विलिनीकरणानंतर ट्विटरवर आयडिया, व्होडाफोन आणि रिलायन्स जिओ यांच्यात चांगलंच ट्विटरवॉर रंगलं. ज्यात नंतर एअरटेलनेही उडी घेतली.
आयडियाने व्होडाफोनला टॅग करुन मजेशीर ट्विट केलं, की “व्होडाफोन, ते सगळे आपल्याविषयी बोलतायत”.
व्होडाफोनने याला लगेच रिप्लाय दिला, “हो आयडिया, आता आपण अधिकृतपणेच जाहीर केलंय”
आयडिया आणि व्होडाफोनच्या या रिप्लायला ग्राहक मजेशीर उत्तरं देत होते. तेवढ्यातच सर्व दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या रिलायन्स जिओनेही यात उडी घेतली आणि दोन्ही कंपन्यांना रिप्लाय दिला. “आम्ही 2016 पासून लोकांना एकत्र आणतोय” असं उत्तर जिओने दिलं.
आयडिया-व्होडाफोनला जिओने दिलेल्या उत्तरावर युझर्स मजा घेत होते, त्यातच एअरटेलनेही यात उडी घेतली. “तुमचा मोबाईल नंबर एअरटेलमध्ये पोर्ट करुन आम्हाला जॉईन करा,” असं ट्वीट करत एअरटेलने एमएनपीची लिंक दिली.