नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन (RCom) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी फार मोठी गोष्ट घेऊन येणार आहे. अनिल अंबानींची कंपनी ही अवघ्या 93 रुपये 10जीबी 4जी डेटा पॅक देणार आहे.


 

भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन पुढच्या आठवड्यात जिओ सर्व्हिसच्या अंतर्गत अवघ्या 93 रुपयात 10 जीबी 4जी डेटा देणार आहे. पण ही ऑफर फक्त CDMA ग्राहक आणि काही मर्यादित सर्कल्सकरताच उपलब्ध असणार आहे.

 

रिलायन्स कम्युनिकेशनच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहिती नुसार 10 जीबी डेटा 93 रुपयात मिळेल तर काही राज्यात तो 97 रुपयात मिळेल.

 

कंपनीनं दूरसंचार विभागाला बुधवारी लिहलेल्या एका पत्रानुसार, कंपनी सुरुवातीला नेटवर्क मुंबई, दिल्ली, कोलकाता, गुजरात आणि आंध्रप्रदेश यासारख्या 12 प्रमुख सर्कल्समध्ये सुरु करणार आहे.

 

कंपनीचा जिओसोबत झालेल्या करारानुसार 800 मेगाहर्त्झ स्पेक्ट्रमचा वापर करुन नेटवर्कला 4जीमध्ये स्थानांतरित करणं सुरु करणार आहे. याआधी कंपनीनं 6,600 कोटी रुपयात 20 सर्कल्समध्ये 850 मेगाहर्त्झ बॅण्ड स्पेक्ट्रम विकत घेतले होते.