मुंबई: सोशल वेबसाइट ट्विटरनं आपल्या यूजर्ससाठी आता आणखी एक खास भेट आणली आहे. यापुढे यूजर्स ट्विटरवर पूर्वीपेक्षा अधिक जास्त वेळेचा व्हिडिओ अपलोड करु शकतात.


 

यापुढे ट्विटरवर 140 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ शेअर करता येणार आहे. यापूर्वी 30 सेकंदाचाच व्हिडिओ अपलोड करता येत होता. मात्र आता ही वेळ वाढविण्यात आली आहे.

 


 

फेसबुक व्हिडिओ फिचरला टक्कर देण्यासाठी ट्विटरनं हा नवा बदल केला असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओ शेअरिंग दिवसेंदिवस वाढत असल्यानं ट्विटरनं देखील आपल्या यूजर्संना आकर्षित करण्यासाठी व्हिडिओ शेअरिंगची वेळ वाढवली आहे.

 

यूजर्स वाइन अॅपवरही व्हिडिओ पाहू शकतील. यासाठी 6 सेंकदाचा व्हिडिओ प्रीव्ह्यू देखील असणार आहे.