रिलायन्स जिओकडून 'जीएसटी रेडी स्टार्टर कीट' लॉन्च, किंमत फक्त..
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2017 10:34 AM (IST)
मुंबई : आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनं जीएसटी रेडी स्टार्टर कीट लॉन्च केलं आहे. यात जिओफाय या आपल्या वायफाय डिव्हाईससोबत जीएसटीसाठी मोबाईल बेस्ड सॉफ्टवेअर सोल्यूशन जिओनं ऑफर केलं आहे. कंपनीनं या ऑफरमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 24 जीबीचा डेटाही देऊ केला आहे. जिओ काही शहरांमध्ये डोअरस्टेप सिम अक्टिव्हेशन सुविधाही आपल्या ग्राहकांना देणार आहे. जिओफाय हे रिलायन्स जिओचं पोर्टेबल ब्रॉडबँड डिव्हाईस आहे, जे ईएमआयवरही घेता येणार आहे. जीएसटी रेडी स्टार्टर कीटची किंमत रिलायन्सनं 1999 रुपये इतकी ठेवली आहे, तर ईएमआयवर हे कीट केवळ 95.03 रुपयांना उपलब्ध आहे. काय असेल जिओच्या जीएसटी रेडी कीटमध्ये? जिओच्या जीएसटी रेडी कीटमध्ये मोबाईल बेस्ड अप देण्यात येईल, ज्यात जीएसटी सुविधा प्रोव्हायडर आणि अप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर एका वर्षासाठी देत आहे. या दोन सुविधांमुळे जीएसटीसंबंधी अकाऊंटिंग आणि बिलिंगसाठी कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नसेल. जिओनं एका किंमतीत 5 सेवा देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ज्यात जिओफाय, अनलिमिटेड व्हॉईस प्लस डेटा प्लॅन, जिओ बिलिंग अप्लिकेशन आणि जिओ नॉलेज सीरिज अशा पाच सेवा देण्यात येतील.एकूण 10,884 रुपयांहून अधिकच्या सेवा फक्त 1999 रुपयांमध्ये देत असल्याचा दावा रिलायन्सनं केला आहे.