मुंबई : फेसबुकने आपल्या अँड्रॉईड आणि आयओएस युझर्सना 'फाईंड वायफाय' हे फीचर देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी या फीचरची चाचणी सुरु करण्यात आली होती. चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता जगभरातील युझर्सना या सेवेचा लाभ मिळणार आहे.


'फाईंड वायफाय' हे फीचर आता जगभरातील फेसबुक युझर्ससाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी काही निवडक देशांमध्ये ही सुविधा देण्यात आली होती, असं फेसबुकचे इंजिनिअरिंग डायरेक्टर अॅलेक्स हिमेल यांनी म्हटलं आहे.

केवळ प्रवास करणाऱ्या युझर्ससाठीच नव्हे, तर ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही, अशा ठिकाणी 'फाईंड वायफाय' फीचर उपयोगी असल्याचं दिसून आलं, असंही अॅलेक्स हिमेल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फ्री वायफाय हॉटस्पॉट कसा शोधणार?

फ्री वायपाय हॉटस्पॉट शोधण्यासाठी फेसबुक अॅपमधील मोअरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर फाईंड वायफाय हा पर्याय दिसेल. फाईंड वायफाय चालू केल्यानंतर जवळच्या डेटा सेंटर्सची माहिती मिळेल.