मुंबई : पहिल्याच महिन्यात तबब्ल 1 कोटी 60 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्यच्याच्या विक्रमाची नोंद रिलायन्स जिओने केली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप किंवा अन्य कोणत्याही स्टार्टअपची सुरुवात पाहता रिलायन्स जिओ सर्वात पुढे आहे. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील आणि स्टार्टअप कंपन्यांच्या प्रसारातील विश्वविक्रम मानला जातो आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या 'रिलायन्स जिओ'च्या 4G सेवेची औपचारिक सुरुवात 5 सप्टेंबरला झाली होती. भारतीय बाजारपेठेत रिलायन्स जिओ सिम पहिल्या 26 दिवसांतच 1.6 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचलं.

"अधिकाधिक लोक रिलायन्स जिओचा वापर करत असल्याचा आनंद आहेच. मात्र, या सिमचा खरा उद्देश इंटरनेट डेटाच्या मदतीने प्रत्येक भारतीयाला सशक्त बनवायचं आहे.", असे रिलायन्स कंपनीने सांगितलं.

दरम्यान, रिलायन्स जिओ सध्या 'वेलकम ऑफर'मध्ये सुरु असून, त्याप्रमाणे ही सेवा डिसेंबरपर्यंत पूर्णपणे मोफत आहे. रिलायन्स कंपनीने नुकतंच आयफोन यूझर्ससाठी आपली जिओ सेवा वर्षभरासाठी म्हणजेच डिसेंबर 2017 पर्यंत मोफत देण्याची घोषणा केली आहे. 10 कोटी ग्राहकांचं लक्ष्य कंपनीने ठेवलं आहे.