नवी दिल्लीः सर्वात स्वस्त डेटा प्लॅन देणाऱ्या रिलायन्स जिओने अजून एक धमाकेदार ऑफर आणली आहे. आयफोन युझर्सना दीड वर्षांसाठी मोफत डेटा देण्याची घोषणा रिलायन्सने केली आहे. रिलायन्स स्टोअर्समध्ये आयफोनची खरेदी केल्यास या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
काय आहे ऑफर?
नवीन आयफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ वेलकम ऑफरसोबतच 1499 रुपयांचा डेटा प्लॅन मोफत मिळणार आहे. ग्राहकांना दीड वर्षांसाठी अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. जानेवारी 2017 पासून ही ऑफर सुरु होणार असून रिलायन्स स्टोअर्समध्ये आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल, असं रिलायन्सने सांगितलं आहे.
या ऑफरनुसार एसटीडी कॉल, 20 GB 4 GB डेटा, रात्री अनलिमिटेड 4 GB डेटा, 40 GB वायफाय डेटा आणि माय जिओ अॅपवर शॉपिंग अशा ऑफर आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहेत.
रिलायन्स जिओच्या सर्व मोफत सेवा डिसेंबर 2016 पर्यंतच मिळणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनी मोठा धमाका करण्याच्या तयारीला लागली आहे. आयफोन 6, आयफोन 6 एस, आयफोन एस प्लस, आयफोन एस ई, आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस या फोन्सवर ही ऑफर मिळणार आहे.