मुंबई : रिलायन्सच्या बहुचर्चित जिओ 4G सेवेला आजपासून सुरुवात होणार आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 1 सप्टेंबर रोजी जिओ 4Gचं उद्घाटन केलं होतं.
रिलायन्स जिओ 4G सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना डिसेंबरपर्यंत मोफत अमर्यादित डेटा देण्यात येणार आहे. तसंच आयुष्यभरासाठी मोफत आऊटगोईंग कॉल्स आणि मोफत रोमिंगही देण्यात येणार आहे.
रिलायन्स जिओ 4G सेवेसोबतच मुकेश अंबानी यांनी आपल्या जुळ्या मुलांना कॉर्पोरेट जगतात लॉन्च केल्याचीही चर्चा रंगली होती. तसंच या सेवेमुळे प्रभावित झालेल्या टेलिकॉम कंपन्यांनीही या सेवेला कडाडून विरोध केला होता.
आजपासून सुरु होणाऱ्या रिलायन्स जिओच्या सिम कार्डसाठी लोकांनी सर्वत्र रांगा लावल्या होत्या. या सिमच्या वाढत्या मागणीला विचारात घेऊन देशभरातील जवळपास 2 लाख स्टोअर्समधून जिओ 4G सिमची विक्री केली जाणार आहे.
संबंधित बातम्या :
रिलायन्स जिओ 4G बाबत सर्व काही एकाच क्लिकवर
भारतीय आता 'गांधीगिरी'सोबत 'डाटा-गिरी'ही करतील : मुकेश