जाणून घेऊ या स्मार्टफोनचे फीचर्स आणि भारतीय मार्केटमधील किमतींविषयी
Redmi Note 8 Pro हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टेड आहे. याची स्क्रिन 6.53 इंच आहे. यात 8GB रॅम आहे. Redmi Note 8 सारखेच चार कॅमेरे Redmi Note 8 Pro मध्ये देखील दिले आहेत. Redmi Note 8 Pro व्हेरियंटमध्ये हा पहिला 64 मेगापिक्सल कॅमेरा फोन आहे. या सेंसरसोबतच साथ कंपनीने 8 मेगापिक्सलचा वाईड-अँगल सेंसर आणि दोन 2 मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे. फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Redmi Note 8 Pro स्मार्टफोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी दिली आहे.
या स्मार्टफोनच्या 6 GB RAM + 64 GB स्टोअरेजच्या व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 GB RAM + 128 GB स्टोअरेजच्या व्हेरियंट वेरिएंट ची किंमत 15,999 रुपये आहे. तर 8 GB RAM + 128 GB स्टोअरेजच्या मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. चीनच्या मार्केटमध्ये रेडमी नोट 8 प्रो ची किंमत 1,399 चिनी युआन म्हणजे 14 हजार रुपयांपर्यंत आहे.
Redmi Note 7 Pro | रेडमी नोट 7 प्रो स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती
नुकताच शाओमी (Xiaomi) चा 48 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला मिड-रेंज स्मार्टफोन Redmi Note 7 Pro स्वस्त करण्यात आला आहे. कंपनीने या फोनची किंमत कायमसाठी दोन हजार रुपयांनी कमी केली आहे. कपातीनंतर या फोनची सुरुवातीची किंमत आता 11,999 रुपये झाली आहे. कंपनीने हा फोन 2019 च्या सुरुवातीला लॉन्च केला होता. लॉन्चच्या वेळी 4 GB रॅम +64 GB इंटरनल स्टोअरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये होती, आता ती 11,999 रुपये केली आहे. 6 GB रॅम+64 GB स्टोअरेज व्हेरियंटचा फोन आता 13,999 रुपयांना मिळणार आहे. तसंच 6 GB रॅम+128 GB स्टोअरेजच्या टॉप-एंड व्हेरियंटबद्दल बोलायचं झालं तर तो आता 16,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयात खरेदी करता येऊ शकतो.