नवी दिल्ली : स्मार्टफोन क्षेत्रात छाप पाडणाऱ्या गुगलने बहुप्रतीक्षित ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ स्मार्टफोन लॉन्च केले आहे. अमेरिकेत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कंपनीने आपले दोन फोन स्मार्टफोन सादर केले आहे. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ हे स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार नाहीत. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ ही गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या फोनची पुढील आवृत्ती आहे.
गुगलच्या पिक्सल मालिकेतील मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरे असतात. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ हे दोन्ही स्मार्टफोन अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत. परंतु भारतात हे फोन पिक्सेल प्रेमींसाठी उपलब्ध नसतील. पिक्सल 4 ची किंमत 57 हजार रुपये आणि पिक्सल 4 एक्सएलची किंमत 64 हजार रुपये असणार आहे.
‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ हे दोन्ही स्मार्टफोन काळा, पांढरा, नारंगी या दोन रंगात सादर केले आहेत. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 SOC प्रोसेसर 6 जीबी रॅम आहे. गुगल पिक्सल स्मार्टफोनमध्ये रडार सेन्सरचा वापर केला आहे. जो 60GHz mmWave फ्रीक्वेन्सीवर चालतो. भारत सरकारने अजून या फ्रीक्वेन्सी रेंजला मान्यता दिली नाही त्यामुळे हा फोन भारतात उपलब्ध होणार नाही असे म्हटलं जात आहे. मात्र पिक्सल 4 ही मालिका भारतात सादर न करण्याचं कारण गुगलने अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’
पिक्सल 4 ची स्क्रीन साइज 5.7 इंच असून त्याची किंमत 799 डॉलर (भारतात 57,000 रुपये ) आहे आणि पिक्सल 4 एक्सएल 6.3 इंच स्क्रीनसह 899 डॉलर (भारतात 64,000 रुपये ) आहे. पिक्सल 4 मध्ये 64 जीबी आणि पिक्सल 4 एक्सएल 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे.
‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल लॉन्च, जाणून घ्या किंमत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2019 08:58 AM (IST)
अमेरिकेत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कंपनीने आपले दोन फोन स्मार्टफोन सादर केले आहे. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ हे स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार नाहीत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -