मुंबई : शाओमीने आपला बहुप्रतीक्षित रेडमी नोट 4X स्मार्टफोन अखेर लॉन्च केला आहे. शाओमीने रेडमी नोट 4X स्मार्टफोनचे काही फीचर्सची माहिती दिली आहे. त्यानुसार 13 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 4100 mAh क्षमतेची बॅटरी, हे या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. सध्या चीनमध्ये लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे सर्व फीचर्स कंपनीकडून सांगण्यात आले नाहीत.



रेडमी नोट 4X चे इतर फीचर्स :

  • 5 इंचाचा स्क्रीन (1080×1920 रिझॉल्युशन)

  • स्नॅपड्रॅगन 625 ऑक्टाकोर प्रोसेसर

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 4100 mAh क्षमतेची बॅटरी


शाओमीने हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला असून, याची किंमत मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. येत्या 14 फेब्रुवारीपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु करण्यात येणार आहे.

शाओमी रेडमी नोट 4X Hatsune Miku एडिशन

शाओमीच्या Hatsune Miku सोबत लिमिटेड एडिशन रेडमी नोट 4X डिव्हाईस लॉन्च केले आहेत. 14 फेब्रुवारीला विक्रीसाठी उपलब्ध असेल. Hatsune Miku हिरव्या रंगासोबतच शॅम्पेन गोल्ड, मॅट ब्लॅक, चेरी पाऊडर, प्लेटिनम सिल्व्हर, ग्रे या रंगांमध्येही उपलब्ध आहेत.