Exchange Offer: अवघ्या 4,000 रुपयात आयफोन 6
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2017 11:12 AM (IST)
मुंबई: जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर आता तुमच्यासाठी एक खास ऑफर फ्लिपकार्टनं आणली आहे. आयफोन 6 आता तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये अवघ्या चार हजारात मिळू शकतो. आयफोन 6च्या 16 जीबी ग्रे मॉडेल आता अवघ्या 4,000 हजारात एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला तब्बल 24 हजारापर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. यासोबतच 9000 रुपयापर्यंत फ्लॅट डिस्काउंट दिलं आहे. त्यामुळे 27,990 किंमतीचा आयफोन 6 तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 3,999 रुपयात खरेदी करु शकतात. तसेच अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड यूजर्सना 5 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. दरम्यान, तुम्ही कोणतं मॉडेल एक्सचेंज करणार आहात यावर तुम्हाला देण्यात येणारी सूट अवलंबून आहे. आयफोन 6मध्ये 4.7 इंच रेटिना HD डिस्प्ले असून यामध्ये 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी आहे. तसेच यामध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 1.2 फ्रंट कॅमेरा आहे.