मुंबई : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी आपला रेडमी नोट 4 आज भारतात लॉन्च होणार आहे. आज दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तसंच फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.


शाओमीचा रेडमी नोट 4 सेल स्टॉक शिल्लक असेपर्यंतच सुरु राहणार आहे. सध्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. त्यातच हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची रॅम 2 ते 4 जीबी पर्यंत असेल तर किंमत 9999 ते 12999 रुपये असेल. याची बॉडी मेटल फिनिशमध्ये असेल. तसंच रिअर फिंगरप्रिंट सेन्सरही असेल.

हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि डार्क ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

या स्मार्टफोनमध्ये तीन व्हेरिएंट उपलब्ध असतील.

2 जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरीसह स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये असेल.

3 जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरीसह स्मार्टफोनची किंमत 10999 रुपये असेल.

4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरीसह स्मार्टफोनची किंमत 12999 रुपये असेल.

रेडमी नोट 4 चे फिचर्स

ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो

प्रोसेसर : 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

रॅम : 2/3/4 जीबी

डिस्प्ले : 5.5 फुल एचडी डिस्प्ले

कॅमेरा : रिअर 13 मेगापिक्सेल आणि रिअर 5 मेगापिक्सेल

मेमरी : 32 जीबी आणि 64 जीबी

बॅटरी : 4100 mAh

इतर फिचर्स : 4G VoLTE, wi-fi, Bluetooth, GPS,Micro-USB