xioami band 7 launch in india : तुम्हीसुद्धा बॅंडप्रेमींपैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील आठवड्यात 24 मे रोजी नवीन Redmi Note 11T सीरीजसह अनेक प्रोडक्ट्स लॉन्च करत आहेत. कंपनीकडून असे सांगण्यात आवले आहे की, या इव्हेंटमध्ये एक नवीन फिटनेस बँड देखील लॉन्च करणार आहेत. हा बॅंड Xiaomi Band 7 असणार आहे. 


कंपनीने चीनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट Weibo वरील नवीन पोस्टमध्ये वेअरेबलची काही फीचर्सदेखील ओपन केली आहेत. आतापर्यंत आपल्याला Xiaomi Band 7 किंवा Mi Band 7 बद्दल बरेच काही माहित आहे.


Xiaomi Band 7 हे सिग्नेचर पिल-आकाराचे डिझाइन आहे ज्यामुळे ते अल्पावधीतच लोतप्रिय झाले आहे. या वेळी डिव्हाइसमध्ये 1.62-इंच AMOLED स्क्रीन असेल, जी Mi Band 6 वरील 1.56-इंच स्क्रीनपेक्षा मोठी आहे. बँड 7 वर अधिक स्क्रीन स्पेसचा लाभ घेण्यासाठी Xiaomi बँडच्या UI मध्ये किंचित बदल करू शकते.


नवीन टीझरमध्ये ज्या प्रमाणे दाखवले आहे ते असे सूचित करते की, Xiaomi Band 7 NFC सपोर्टसह येईल. Mi Band 4 सारख्या पूर्वीच्या वेअरेबलला चीनमध्ये NFC सपोर्ट होता, तर बँडच्या जागतिक आणि भारतीय प्रकारांना नाही.


या बॅंडमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये असतील ? 


बँडच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये स्टेप काउंटिंग, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग (SpO2) आणि, कॅलरीज काऊंट्स, या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त हवामान सूचना, म्युझिक कंट्रोल आणि अलार्म या वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. कंपनी या वर्षी Xiaomi Band 7 मध्ये या व्यतिरिक्त आणखी काही वैशिष्ट्य देतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे असेल. हे प्रो़क्ट लॉंन्च झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात कंपनीकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.     


महत्वाच्या बातम्या :