Redmi Note 11 Pro : Xiaomi चा पार्टनर ब्रँड Redmi ने Redmi Note 11 Pro सीरीज भारतात लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत, दोन नवीन स्मार्टफोन Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus लाँच करण्यात आले आहेत. पहिला 4G स्मार्टफोन आहे, तर दुसरा स्मार्टफोन 5G ला सपोर्ट करतो. भारतात Redmi Note 11 Pro सीरीजची किंमत 17,999 रुपयांपासून सुरू होते. हे स्मार्टफोन Poco X3 Pro, Samsung Galaxy A22, Oppo F19s आणि Realme 8s 5G सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करतील. 


डिस्प्ले आणि रॅम :
Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus मध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि फुलएचडी + रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आहे. Redmi Note 11 Pro 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह MediaTek Helio G96 प्रोसेसरद्वारे उपलब्ध आहे. तर Redmi Note 11 Pro Plus मध्ये Snapdragon 695 प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. दोन्ही स्मार्टफोनला Android 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित MIUI 13 मॉडेल आहे. 


कॅमेरा आणि बॅटरी : 
कंपनीने Redmi Note 11 Pro सीरीजमध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. Redmi Note 11 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर, 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. दुसरीकडे, Redmi Note 11 Pro Plus मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यामध्ये 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर नाही. दोन्ही फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 


किंमत :
Redmi Note 11 Pro ची किंमत रु. 17,999 पासून सुरू होते. ही किंमत 6GB + 128GB व्हेरिएंटची आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे, Redmi Note 11 Pro Plus च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे, 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 11 Pro ची पहिली विक्री 23 मार्चपासून Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू होईल. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha