Redmi Note 10: मागील सेलमध्ये रेडमीचा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 10 खरेदी करण्यापासून चुकले असेल, तर आज आपल्याकडे आणखी एक संधी आहे. 11,999 रुपयांच्या किंमतीसह या फोनचा सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून अॅमेझॉन इंडिया आणि mi.com सुरू होईल. मागील वेळेप्रमाणे या वेळीही कंपनी सेलमध्ये आकर्षक ऑफरसह फोन सेल करणार आहे.


आजच्या सेलमध्ये रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना फोन खरेदी केल्यावर जियोचे 10 हजार रुपयांचे फायदे मिळतील. जिओच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी वापरकर्त्यांना mi.com वरून फोन विकत घ्यावा लागेल आणि नंबर 349 रुपयांच्या प्लान रिचार्ज करावा लागेल. याशिवाय हा फोन अॅमेझॉन इंडियावर नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक ऑफर्ससह देखील खरेदी करता येईल.


रेडमी नोट 10 चे स्पेसिफिकेशन


रेडमीचा हा बजेट स्मार्टफोन अनेक वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 6 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो. स्क्रीनबद्दल बोलायचे तर फोनमध्ये 6.43-इंचाचा सुपर एमोलेड नॉच डिस्प्ले आहे ज्यामध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशन आहे.


फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10 मध्ये एलईडी फ्लॅशसह चार रियर कॅमेरे आहेत. यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर, 2-मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.


फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 512 जीबी पर्यंतच्या मायक्रो एसडी कार्डना सपोर्ट करणार्‍या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4जी VoLET, WiFi, ब्लूटूथ 5.0, जीपीएस / ए-जीपीएस, इन्फ्रा-रेड, 3.5 मिमी हेडफोन जॅक यूएसबी टाइप-सी पोर्ट असे पर्याय आहेत.