Redmi 12 pro plus with 200mp Camera will Coming Soon: चिनी ब्रँड Xiaomi लवकरच भारतात Redmi 12 Pro Plus हा नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. नवा स्मार्टफोन कंपनीची Redmi Note 12 5G सीरीज एक भाग असणार आहे. नुकताच हा स्मार्टफोन कंपनीकडून चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीनं या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro Plus या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. भारतात Xiaomi केवळ Redmi Note 12 Pro Plus मॉडेल लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे. 


Redmi Note 12 Pro Plus हा मिड-रेंज फोन असू शकतो, अशी माहिती मिळत आहे. याची किंमत 25,000 रुपयांहून कमी असू शकते. स्मार्टफोन चीनमध्ये 2,099 युआन म्हणजेच, भारतीय चलनानुसार, अंदाजे 23,000 रुपयांना विकला जात आहे. फोनचं बेस मॉडेल 256GB इंटरनल स्टोरेजसह 8GB रॅम पॅकसह युजर्सना मिळणार आहे. भारतात रेडमी नोट 12 प्रो प्लसप्रमाणेच स्पेसिफिकेशन्स मिळणार असल्याचं बोललं जात आहे. 


Redmi Note 12 Pro Plus चे संभाव्य स्पेसिफिकेशंस


Redmi Note 12 Pro Plus मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी  OLED स्क्रीन मिळणार आहे. फोन 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनची मीडियाटेक डायमेंसिटी 1080 चिपसेटसह येण्याची शक्यता आहे. यामध्ये 12GB पर्यंत LPDDR4X रॅम दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


क्वाड कॅमेरा सेटअप


फोटोग्राफीसाठी आगामी Redmi Note 12 Pro Plus मध्ये मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. फोनच्या इतर तीन सेन्सर्ससह मागील बाजूस 200MP चा मुख्य सेन्सर असू शकतो. स्मार्टफोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 16MP कॅमेरा मिळू शकतो. या डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 120 वॅट्सपर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.


Realme 10 Pro Plusची सोबत स्पर्धा 


Redmi Note 12 Pro Plus ची आगामी Realme 10 Pro Plus सोबत स्पर्धा असणार आहे. हा स्मार्टफोन अलीकडेच भारतात लॉन्च करण्यात आला होता. Reality 10 Pro Plus ची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. यात तीन मॉडेल्स आहेत. ज्यात 6GB+128GB, 8GB+128GB आणि 8GB+256GB समाविष्ट आहेत. फोन हायपरस्पेस, डार्क मॅटर आणि नेबुला ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. हे ऑक्टा-कोर 6nm MediaTek Dimensity 1080 5G SoC द्वारे समर्थित आहे आणि त्यात 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.