Google Gmail Latest News: गुगल ( Google) ची ई मेल सेवा म्हणजेच जी मेल Gmail ठप्प झाली होती. याचा फटका जगभरातील लाखो वापरकर्त्यांना बसला. भारतातील अनेक Gmail वापरकर्त्यांनी याबाबत तक्रार केली होती. आपलं जीमेल Gmail अॅप व्यवस्थित काम करत नसल्याचं यूजर्सचं म्हणणं आहे. जीमेलसोबतच जीमेल एंटरप्रायझेसच्या सेवेवरही परिणाम झाला. जीमेलचे जगभरात 1.5 अब्ज वापरकर्ते आहेत. Downdetector.com नं याबाबत सांगितलं आहे की, एका स्पाईकमुळं जीमेल ठप्प झाली होती. आताच्या अपडेट्नुसार जी मेलची सुविधा व्यवस्थित सुरु असल्याचं काही वेबसाईट्सनी म्हटलं आहे.
अलिकडेच नवीन अपडेटमध्ये Gmail अॅपच्या सर्चमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जुलैमध्ये Gmail मध्ये चांगल्या प्रकारे सर्च आणि वेगवेगळ्या नवीन ऑप्शन्सबाबत घोषणा केली होती. आता गुगलचे म्हणणे आहे की त्यांची मोफत ईमेल सेवा आता यूजर्संना आणखी चांगले सर्च रिझल्ट देण्यासाठी काम करेल. एका ब्लॉग पोस्टनुसार, जीमेल अॅपमध्येच अलीकडेच एक सर्च अॅक्टिव्हिटी केली होती. त्यातून आलेल्या रिझल्टनंतर गुगलनं हे अपडेट आणलं होतं.
डाउनडिटेक्टरच्या मते, संध्याकाळी सात वाजल्यापासून जीमेलच्या सेवेत अडचणी येत होत्या. अॅप्स आणि वेबसाइटच्या ऑनलाइन स्थितीचा मागोवा घेणारी वेबसाइट DownDetector ने देखील आउटेजबद्दल ट्विट केले होते. अद्याप आउटेज किती मोठा होता हे देखील स्पष्ट नाही. ट्विटरवरील अनेक वापरकर्त्यांनी तक्रार केली की जीमेल सुविधा ठप्प झाली आहे आणि ती काम करत नाही. ॉ तर दुसरीकडे Google Workspace डॅशबोर्ड सर्व Google सेवा हिरव्या रंगात म्हणजे सुरु असल्याचं दाखवत होता.
DownDetectorनं म्हटलं आहे की, वापरकर्त्यांच्या तक्रारीवरुन जीमेलला सकाळी 9.12 वाजेपासून समस्या येत आहेत. हा आउटेज किती मोठा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्विटर वापरकर्ते त्यांचे जीमेल डाउन झाल्याची तक्रार करत होते.
जगभरातील 1.5 अब्जाहून अधिक वापरकर्ते गुगलची मेल सेवा डाउन झाल्यामुळे त्रस्त झाले होते. Gmail चे जगभरात 1.5 अब्ज पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. 2022 मध्ये सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्समध्ये Gmail सर्वात वरच्या स्थानावर आहे.