Realme Watch 3 Launch: Realme ने आपली नवीन स्मार्ट घड्याळ Realme Watch 3 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या घड्याळासोबत Realme ने Realme Pad X टॅबलेट, Buds Air 3 Neo, Buds Wireless 2S, स्मार्ट कीबोर्ड, स्मार्ट पेन्सिल आणि फ्लॅट मॉनिटर देखील लॉन्च केला आहे. Realme Watch 3 ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह लॉन्च करण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही घड्याळावरून कॉल करू शकता. या घड्याळात मायक्रोफोन आणि स्पीकर देखील देण्यात आला आहे. यासोबतच या घड्याळात 1.8 इंचाचा मोठा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे.  Realme Watch 3 मध्ये ब्लड ऑक्सिजन सपोर्ट देखील देण्यात आला आहे. Realme Watch 3 Smart Watch च्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल माहिती जाणून घेऊ.


Realme Watch 3 चे स्पेसिफिकेशन्स



  • Realme Watch 3 ही कंपनीच्या वॉच 2 स्मार्टवॉचची अपग्रेड केलेले व्हर्जन आहे.

  • Realme Watch 3 मध्ये 1.8-इंचाचा डिस्प्ले आणि मोठी बॅटरी आहे.

  • Realme Watch 3 हार्ट रेट सेन्सर, SpO2 मॉनिटर आणि स्लीप मॉनिटर सपोर्टसह येतो. 

  • कंपनीने दावा केला आहे की वॉच 3 कॉल दरम्यान स्पष्ट ऑडिओसाठी AI नॉईज कॅन्सलेशन अल्गोरिदम वापरते.

  • Realme Watch 3 केसिंगवर व्हॅक्यूम प्लेटेड रिफ्लेक्टिव्ह मेटॅलिक फ्रेम देण्यात आली आहे.

  • Realme Watch 3 मध्ये 110 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत.

  • Realme Watch 3 मध्ये 340mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी एका आठवड्यापर्यंत टिकू शकते.


किंमत 


Realme Watch 3 ची किंमत 3,499 रुपये आहे. मात्र कंपनी ही सुरुवातीला 2,999 रुपयांच्या ऑफर किंमतीवर उपलब्ध करून देणार आहे. याची विक्री 2 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12 वाजता Flipkart, Amazon आणि Reality च्या ऑनलाइन स्टोअर्सवर सुरू होईल.


महत्वाच्या बातम्या :