नवी दिल्ली :  रेडमी नोट 6 प्रो नंतर रेडमी नोट 7 प्रो ची वाढती पसंती आणि विक्री पाहून शाओमी कंपनी एकीकडे खुश आहे तर दुसरीकडे 7  प्रो युझर्स देखील या फोनमधील भन्नाट फीचर्समुळे खुश आहेत.

यातच आता चायनीज स्मार्टफोन कंपनी रियलमीकडून रेडमी 7 प्रो ला टक्कर देण्यासाठी एक नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनचे नाव  रियलमी 3 प्रो असे असेल. हा स्मार्टफोन रियलमी 3 चे अपग्रेडेड व्हर्जन असेल. या स्मार्टफोनमध्ये उत्तम प्रोसेसर आणि चांगला कॅमेरा दिला जाणार आहे. याच महिन्यात दिल्ली विद्यापीठाच्या स्टेडियममध्ये या स्मार्टफोनचा लॉन्चिंग सोहळा होणार आहे.



या स्मार्टफोनमध्ये काय फीचर्स असणार?

या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर असणार आहे. शाओमी रेडमी नोट 7 प्रो मध्ये असणाऱ्या स्नॅपड्रॅगन 675 SoC च्या तुलनेत हे मोठे अपग्रेड असणार आहे. रियलमी 3 प्रो मध्ये 6.3 इंचाचा HD+ ड्यूड्रॉप डिस्प्ले असणार आहे.

रियलमी 3 प्रो मध्ये सोनी IMX519 सेन्सर दिला जाणार आहे तर रेडमी नोट 7 प्रो मध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा रिझोल्यूशन IMX586 सेन्सरसह दिले गेले आहे. सोबतच रियलमी 3 प्रो स्मार्टफोनमध्ये VOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाणार असल्याची देखील माहिती आहे.

रियलमी 3 प्रो मध्ये 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमच्या ऑप्शनसह ऑक्टा-कोर 675 एसओसी प्रोसेसर दिला गेला आहे. रेडमी नोट 7 प्रो च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोअरेज फोनची किंमत 13,999 रुपये आहे तर 6GB रॅम आणि 128GB स्टोअरेज Redmi Note 7 Pro ची किंमत 16,999 रुपये आहे. या तुलनेत रियलमी 3 प्रो ची किंमत 18,990 रुपयांपर्यंत असू शकते अशी माहिती आहे.