मुंबई : नेटफ्लिक्स या जगप्रसिद्ध ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील युजर्ससाठी सर्वात स्वस्त प्लान लाँच करण्यात आला आहे. हा प्लान मोबाईल युजर्ससाठी असून फक्त 250 रुपये किंमतीच्या या प्लानमध्ये महिनाभर नेटफ्लिक्स वापरता येणार आहे.

भारतामध्ये ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅप्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम यासारखे विविध पर्याय सध्या भारतीय युजर्सकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी नेटफ्लिक्सची भारतातील लोकप्रियता जरी जास्त असली तरी त्याची किंमत बऱ्याच युजर्सच्या खिशाला परवडणारी नाही. त्यामुळे कंपनीकडून आता नवीन 250 रुपये किंमतीचा प्लान आणण्यात आला आहे.  ज्यामुळे महागडा वाटणारा हा प्लॅटफॉर्म आता अनेकांच्या खिशाला परवडणारा झाला आहे.

नेटफ्लिक्सचा हा नवीन प्लान  केवळ मोबाईल आणि टॅब्लेट युजर्ससाठी आहे.  250 रुपयांच्या या प्लानमध्ये एचडी किंवा अल्ट्रा एचडी कंटेंट मिळणार नाही. तसेच एकावेळी एकाच डिव्हाईसवर नेटफ्लिक्स वापरता येणार आहे. नेटफ्लिक्सचा हा जगभरातला सध्याचा सर्वात स्वस्त प्लान आहे. आतापर्यंत नेटफ्लिक्सचे 500,650 आणि 800 रुपये असे तीन वेगवेगळे प्लान होते.



यासोबतच नेटफ्लिक्सकडून 'विकली प्लान' आणण्याबाबत देखील विचार सुरु आहे. या विकली प्लानची किंमत जवळपास आठवड्याला 1$ (65 रुपये) असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.