70 रुपयात वर्षभर अनलिमिटेड डेटा, रिलायन्स कम्युनिकेशनचा नवा प्लॅन!
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2017 11:45 AM (IST)
स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत रिलायन्स कम्युनिकेशननं एक नवा टेरिफ प्लॅन लाँच केला आहे.
मुंबई : मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशननं आता एक नवा प्लॅन आणला आहे. RComचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. नवा प्लॅनची किंमत फक्त 70 रुपये आहे. ज्यामध्ये 365 दिवस म्हणजेच तब्बल वर्षभर अनलिमिटेड 2जी डेटा मिळणार आहे. एवढंच नाही तर यामध्ये 56 रुपयांचा टॉकटाइमही मिळणार आहे. रिलायन्स मोबाइलनं ट्वीटरवरुन याची माहिती दिली. स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधून रिलायन्सनं हा नवा प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन घेण्यासाठी रिलायन्स मोबाइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला रिचार्ज करावं लागेल. या प्लॅनमध्ये यूजर्सला 2जी डेटा मिळणार आहे. सध्या बाजारात 4जीची बरीच मागणी आहे. त्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन जिओला टक्कर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा) संबंधित बातम्या : अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, रिलायन्स कम्युनिकेशनचा नवा प्लॅन 168 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरसेलचा नवा प्लॅन