मुंबई : संपूर्ण देशात आज 70 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलनं देखील भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. गुगलनं अनोखं डुडल तयार करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
देशात इंटरनेट सर्चसाठी सर्वात जास्त गुगलाचा वापर केला जातो. जगात साजऱ्या होणाऱ्या विविध सणांनिमित्त गुगलकडून डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. देशभरात आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. याच पार्श्वभूमीवर गुगलनं हे डुडल तयार केलं आहे.
गुगलच्या या डुडलमध्ये भारताचं संसद भवन तिरंगी रंगात दाखवण्यात आलं आहे.
डुडलच्या माध्यमातून गुगलकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2017 08:21 AM (IST)
गुगलनं भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी गुगलनं अनोखं डुडल तयार करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -