मुंबई : आघाडीचे टेलिकॉम नेटवर्क रिलायन्स कम्युनिकेशन्सने त्यांच्या ग्राहकांसाठी खुशखबर आणली आहे. रिलायन्स जिओवर सीडीएमए ग्राहकांना येत्या आठवड्यापासून 4G इंटरनेटची सेवा सुरु होत आहे. विशेष म्हणजे अवघ्या 93 रुपयात 10 GB डेटा देण्याचा कंपनीचा विचार आहे.
सध्या ठराविक सर्कलमध्येच ही ऑफर लागू असेल. इतर अनेक ब्रॉडबँड कनेक्शन्सच्या तुलनेत स्वस्त किमतीत इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आरकॉमचे जे सीडीएमए ग्राहक अपग्रेड करतील त्यांनाच ही सुविधा उपलब्ध होईल.
आरकॉमचे सध्या 80 लाख सीडीएमए ग्राहक असून त्यापैकी 90 टक्के यूझर्सनी अपग्रेड करण्याचा पर्याय निवडला आहे. सुरुवातीला 93 रुपयात 10 GB पर्यंत 4G इंटरनेट सेवा देण्यात येईल. ही किंमत 97 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र रिलायन्सच्या स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत ही किंमत 94 टक्क्यांनी कमी असल्याची माहिती आरकॉमच्या वेबसाईटवर आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश पूर्व आणि पश्चिम, ओदिशा, मध्य प्रदेश आणि बिहार या 12 सर्कलमध्ये 4G डेटा देण्यात येईल. परवानगी मिळाल्यास जुलैच्या मध्यापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थान या सर्कलमध्येही 4G चा विस्तार करण्यात येणार आहे.