मुंबई :  गूगलचा स्मार्टफोन 2016 च्या शेवटी बाजारात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एक रिपोर्टनुसार गूगलने आपल्या स्मार्टफोनसाठी मोबाईल ऑपरेटींग कंपनींशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

 

गूगलच्या या स्मार्टफोनमुऴे अॅपलच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गूगलची योजना आहे. द टेलाग्राफने गूगल आणि काही ऑपरेटींग सिस्टीम कंपनींच्या चर्चेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

 

तसेच द टेलाग्राफने एका वरिष्ठ आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे या स्मार्टफोनचं डिझाइन, उत्पादन आणि सॉफ्टवेअरवर गूगलचे अधिक नियंत्रण असेल असा दावा केला आहे.

 

दरम्यान, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गूगल ब्रॉण्डच्या स्मार्टफोनची संकल्पनेला नकार दिला असून कंपनी नेक्सस सिरिजसाठी आपल्या सहयोगी कंपनींसोबतच काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

 

या स्मार्टफोनमुळे गूगलची सहयोगी कंपनी ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर (ओईएम)सोबतचे संबंध बिघडू शकतील. त्यामुळे गूगलनेही यावर अधिकृत टिप्पणी दिली नाही.

 

गूगलने पिक्सल सी टॅबलेटच्या लाँचिंगसोबतच डिव्हाइस बनवण्याच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. गूगलने हे टॅबलेट गेल्या वर्षी नेक्सस 6 पी आणि 5 एक्स सोबत लाँच केले होते.