मुंबई : अनेक मुंबईकरांना प्रवासात रेडिओवर गाणी ऐकण्याची सवय असते. परंतु आज एफएमवर गाणी ऐकण्याच्या विचारात असाल तर तुमचा भ्रमनिरास होणार आहे. कारण मुंबईतील बहुतांश एफएम चॅनल बंद आहेत.


 

 

ट्रान्समिशनच्या सर्व्हरमध्ये सकाळी 10 च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने एफएम चॅनल बंद असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंबईतील काही एफएम चॅनलवर पुण्याच्या एफएम चॅनलचं ट्युनिंग होत आहे.

 

 

दरम्यान, हा बिघाड किती मोठा आहे आणि तो कधीपर्यंत दुरुस्त होईल हे अद्याप समजू शकलेलं नाही.