नवी दिल्लीः फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 3 बाजारात येण्याची प्रतिक्षा संपली असून हा फोन काल लाँच करण्यात आला आहे. हा फोन काल रात्री 12 वाजता अमेझॉनवर लाँच करण्यात आला असून खरेदी सुरु आहे.


 

या फोनच्या फीचर्सविषयी गेले काही दिवस वेगवेगळी माहिती समोर येत होती. रॅम आणि स्टोअरेजच्या बाबतीत विशेष चर्चा होती. अखेर स्मार्टफोनप्रेमींची ही प्रतिक्षा संपली आहे.

 

फीचर्सः

 

  •  4GB आणि 6GB रॅमचे व्हेरिएंट

  • 4GB रॅम असणाऱ्या व्हेरिएंटमध्ये 32GB, 64GB आणि 128GB असे इंटर्नल स्टोअरेजचे पर्याय

  • 6GB रॅम असणाऱ्या व्हेरिएंट मध्ये देखील 32GB, 64GB आणि 128GB इंटर्नल स्टोअरेजचे पर्याय

  • 5.5 इंच आकाराची AMOLED स्क्रिन. रिझॉल्युशन 1080 पिक्सेल.

  • NFC सपोर्टीव्ह

  • 820 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

  • 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

  • 3000 mAh क्षमतेची बॅटरी.

  • फिंगरप्रिंट स्कॅनर.

  • किंमतः 27 हजार 999 रुपये