मुंबई : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन या स्मार्टफोन प्रोसेसरचं 821 हे नवं व्हर्जन लाँच सकरण्यात आलंय. सध्या अनेक हायएन्ड स्मार्टफोनमध्ये असलेल्या स्नॅपड्रॅगन 820 या प्रोसेसरचं हे अद्ययावत व्हर्जन असेल. आज लाँच करण्यात आलेलं स्नॅपड्रॅगन 821 हे व्हर्जन आधीच्या 820 च्या तुलनेत तब्बल 10 पट अधिक वेगवान असल्याचा दावा क्वालकॉमने केलाय.   ज्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 हे व्हर्जन असेल त्यांच्यासाठी नवीन व्हर्जन रिप्लेसमेंट नसेल.   या नव्या व्हर्जनमुळे स्मार्टफोनचा फक्त स्पीडच वाढणार नाही तर बॅटरीचीही बचत होणार आहे. तसंच स्मार्टफोनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अॅप्सची कार्यक्षमताही वाढू शकेल, असा दावा कंपनीने केलाय.   कोणकोणत्या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821 हा प्रोसेसर असेल हे अजून कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं नाही, तरीही वर्षाखेरीपर्यंत हा अद्ययावत प्रोसेसर असलेले स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.   क्वालकॉम या अमेरिकी कंपनीने चीनमधील शांघायमध्ये भरलेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये आगामी काळ हा 5जी स्पीड कम्युनिकेशनचा असल्याचं भाकित केलं होतं. त्यासाठीची रूपरेखाही त्यांनी या काँग्रेसमध्ये लाँच केली होती. वर्ल्ड मोबाईल काँग्रेस हा जगभरातल्या स्मार्टफोन कंपन्या आणि तंत्रज्ञांसाठी जमू कुंभमेळाच असतो.   क्वालकॉमने आज लाँच केलेला स्नॅपड्रॅगन 821 हा 5जी स्पीडलाही सपोर्ट करू शकेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.