मुंबई: सोशल मीडियातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या फेसबुक मॅसेंजरमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. हा बदल Secret Conversation नावाने करण्यात येणार आहे. यामुळे फेसबुक यूजर्सना मॅसेज चॅट end to end encryption ची सुविधा मिळणार आहे.
Secret Conversation म्हणजे काय?
जे फेसबुक यूजर्स फेसबुक मॅसेंजरचा वापर करतात, त्यांना या सुविधेमुळे महत्त्वाचे मॅसेज प्रायव्हेट ठेवण्याचा ऑप्शन मिळेल. जो यूजर्स आपल्या डिव्हाइसवरून मॅसेज करेल, त्याची चॅट हिस्ट्री त्याच डिव्हाइसवर वाचण्यास मिळेल. जर त्या यूजर्सने दुसऱ्या डिव्हाइसवरून फेसबुक लॉग-इन केल्यास त्याला त्या डिव्हाइसवरून वैयक्तिक मॅसेज वाचायला मिळणार नाहीत. तर त्याला ते मदर डिव्हाइसवर पाहायला मिळतील. याशिवाय यूजर्सला आपले महत्त्वाचे मॅसेज Secret Conversationमध्ये ठेवण्यासाठी वेळेची मर्यादा नसेल.
प्रायोगिक तत्त्वावर चाचणी
फेसबुकची ही सुविधा सध्या प्रयोगिक तत्वावर वापरण्यात येत आहे. फेसबुक यूजर्स आपला आयडी मल्टीपल डिव्हाइसवरून यूज करत असल्याने फेसबुकला ही सुविधा राबविण्यासाठी सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी येऊ शकतात. पण फेसबुकच्यावतीने देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही सुविधा वापरासाठी व्हिडीओ, ग्राफिक्स किंवा अर्थिक व्यवहारासाठी याचा वापर करता येणे सध्या शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
फेसबुकने Secret Conversation ही सुविधा सध्या काही ठरविक यूजर्सनाच वापरासाठी दिली असून, जर याचे परिणाम चांगले मिळाल्यास ही सुविधा सर्वांसाठी राबविण्यात येणार आहे.
ही सुविधा सुरुवातीला ब्लॅकबेरीने सुरु केली. त्यानंतर या सुविधेची उपयुक्तता पाहता व्हाटसअॅपनेही ही सुविधा आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध करून दिली. आता फेसबुकही ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे.