मुंबई : पोचिंकी... सॅन मार्टीन... अल-अझर... अल-पोझो... ड्रॉप... फॉलो मी... फायर... नॉकआऊट... रिवाईव्ह... गेट टू द सेफ झोन... असॉल्ट रायफल... स्नायपर... हे शब्द आता अनेकांच्या परिचयाचे झाले आहेत. 21 व्या शतकातलं व्हर्च्युअल युद्ध म्हणजेच 'प्लेयर अननोन'स् बॅटलग्राऊंड अर्थात पब्जी! या पब्जीमुळेच मानसिक ताण कमी होत असल्याचा दावा, प्लेयर्स करतात.
इंटरनेटवर सेन्सेशन ठरलेल्या या गेमने अनेक जणांच्या मोबाईलमध्ये जागा मिळवली आहे. चौकाचौकात मुलं अशाप्रकारे ग्रुप करुन बसतात, की जणू देशासमोरील आव्हानाचं चिंतन व्हावं. त्यामुळे प्रत्येक पालकाला एकच प्रश्न भेडसावत आहे.
'पब्जी'ग्रस्त लेकाच्या माऊलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच समस्या मांडली. आता पंतप्रधान काय उत्तर देणार, याकडे समस्त पब्जी स्कॉडचं लक्ष लागलेलं. मात्र पब्जीची ख्याती मुलांमध्येच नाही, तर देशाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आपल्या पंतप्रधानांपर्यंत पोहचली आहे.
'ये पब्जीवाला लगता है' असं सांगत 'विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान वापरु द्या, फक्त त्यांना रोबो होऊ देऊ नका' असा समतोल सल्ला पंतप्रधानांनी दिला. त्यामुळे अनेक पब्जी प्लेयर्स अभिमानाने खळाळले.
पब्जीचं वेड दिवसेंदिवस वाढतच जात आहे. पब्जी खेळण्याची इतकी आवड का, हे पब्जी खेळणारे तरुण उत्साहाने सांगतात. कोणाला एकाग्रता वाढवण्याचा हा मार्ग वाटतो, तर कोणाला पब्जीमुळे मानसिक तणाव कमी होत असल्याचं वाटतं.
पब्जी हा आता गेम राहिलेला नाही, तर हे व्यसन झालेलं आहे. तसं ऑनलाईन गेम्सचं फॅड काही आजचं नाही. आधी तो फार्मविल होता, कधी तो 'पोकेमॉन गो' झाला, तर आता पब्जी. त्यामुळे आपला मुलगा गेम्सच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये याची काळजी पालकांनी वेळीच घेतलेली बरी. नाहीतर आयुष्याच्या बॅटलग्राऊण्डवर नॉक ऑऊट व्हायला वेळ लागणार नाही.
'पब्जी'मुळे मानसिक ताण कमी, पंतप्रधानांच्या सल्ल्यानंतर प्लेयर्स खुश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2019 04:37 PM (IST)
पब्जीचं वेड दिवसेंदिवस वाढतच जात आहे. पब्जी खेळण्याची इतकी आवड का, हे पब्जी खेळणारे तरुण उत्साहाने सांगतात. कोणाला एकाग्रता वाढवण्याचा हा मार्ग वाटतो, तर कोणाला पब्जीमुळे मानसिक तणाव कमी होत असल्याचं वाटतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -