नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारत सरकारने PUBG Mobile गेमवर संपूर्ण देशात बंदी घातली. केंद्र सरकारने आणखी 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून यामध्ये PUBG अॅपचाही समावेश आहे, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे. पब्जी बॅन झाल्यानंतर पब्जीप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या गेमने भारतातील लाखो लोकांना आपलं फॅन केलं होतं. विशेषतः तरुणांमध्ये या गेमची क्रेझ प्रचंड पाहायला मिळत होती. अशातच आता पब्जी लवर्ससाठी आनंदाची बातमी आहे. भारतात पब्जीवर घालण्यात आलेली बंद उठवली जाऊ शकते.
असं करू शकतं PUBG कमबॅक
भारतात बॅन झाल्यानतंर PUBG Corp.च्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, चिनी कंपनी Tencent Games कडून भारतात गेम पब्लिश करण्याचे राइट्स काढून घेतले आहेत. त्यामुळे कंपनी आता भारतात गेम ऑफर करून शकत नाही. परंतु, PUBG Corp. साऊथ कोरियन कंपनी आहे, जी भारतात डायरेक्ट गेम ऑफर करू शकते. PUBG Corp.च्या वतीने देण्यात आलेल्या या माहितीमुळे पब्जीप्रेमींच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आता भारतात पुन्हा एकदा PUBG गेम कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
118 अॅप्स बॅन
भारत सरकारने काही दिवसांपूर्वी युजर्ससोबतच देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं सांगत 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. बंदी घालण्यात आलेल्या या अॅपस्मध्ये अनेक नावाजलेल्या आणि लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता.
PUBG च्या जागी येणार भारतीय FAU-G
पब्जी बॅन झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने भारतीय FAU-G या गेमची घोषणा केली होती. अक्षयने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती. अक्षय म्हणाला होता की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देत FAU-G हा गेम सादर करताना अभिमान वाटत आहे. करमणुकीव्यतिरिक्त, हा गेम खेळताना खेळाडू आपल्या सैनिकांच्या संघर्षाविषयी जाणून घेतील. या गेममधून मिळाणाऱ्या पैशांपैकी 20% निधी जवानांना देण्यात येणार आहे.'
महत्त्वाच्या बातम्या :
केंद्र सरकारकडून PUBG सह 118 चीनी अॅप्सवर बंदी
PUBG च्या जागी येणार भारतीय FAU-G; खिलाडी अक्षय कुमारची घोषणा