मुंबई : वनप्लसचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन OnePlus Nord पुन्हा एकदा सेलमध्ये खरेदी करण्याची संधी युजर्सना मिळणार आहे. हा स्वस्त फोन जर अद्याप तुम्ही खरेदी केलेला नसेल तर आज तुम्ही खरेदी करू शकता. वनप्लस नॉर्ड तुम्ही अॅमेझॉन आणि वनप्लस स्टोरवरून खरेदी करू शकता. हा सेल दुपारी दोन वाजल्यापासून सुरु होणार आहे. फोनमध्ये 90 हर्ट्ज फ्लूड एमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 765 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.
किंमत
वनप्लस ने नॉर्डच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंट्सची किंमत 27,999 रुपये ठरवली आहे. तसेच 12GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंट्सची किंमत 29,999 रुपये असणार आहे. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिंयटची किंमत 24,999 रुपये एवढी असणार आहे.
अर्ध्या तासात 70 टक्के चार्ज
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. पावरसाठी या फोनमध्ये 4115mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30T फास्ट चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फक्त 30 मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन 70 टक्के चार्ज होतो. कनेक्टिविटीसाठी हा फोन 4G व्यतिरिक्त 5G ला सपोर्ट करणार आहे.
स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord मध्ये 6.44 इंच फुल एचडी प्लस फ्लुइड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट इतका आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरासेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सल प्राइम कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ लेंस असणार आहे. याव्यतिरिक्त सेल्फीसाठी याच्या फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Samsung Galaxy A51 ला टक्कर
वन प्लसची थेट टक्कर सॅमसंगच्या मीड रेंज स्मार्टफोन Samsung Galaxy A51 आहे. यामध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्सल एमोलेड डिस्प्ले देण्यात आल आहे. स्मार्टफोनमध्ये कंपनीने आपला Exynos 9611 प्रोसेसरचा वापर केला आहे. जो Mali G72 GPU सोबत येतो. स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4000mAh बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
Galaxy A51 मध्ये सॅमसंगने क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. तर 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा फोनमध्ये वापरण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्याक आला आहे. याचं अपग्रेडेड व्हेरियंट Galaxy A51 चे 6GB+128GB ची किंमत 23,998 रुपये आहे. जर 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 25,998 रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये 'हे' अॅप्स आहेत? तर, तात्काळ डिलिट करा, अन्यथा...
PUBG च्या जागी येणार भारतीय FAU-G; खिलाडी अक्षय कुमारची घोषणा