PUBG अर्थात Battlegrounds Mobile India गेमच्या भारतीय आवृत्तीची देशात उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. चाहत्यांना गेमच्या लाँचिंगविषयी अधिक उत्सुकता आहे. ही गेम लवकच भारतात लाँच केली जाणार आहे. यापूर्वी हा गेम भारतात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, आत्तासाठी, हा केवळ बीटा आवृत्तीच्या टेस्टिंगसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. म्हणजेच, Google Play Store वरून मर्यादित संख्येने वापरकर्ते हे डाउनलोड करू शकतात. बीटा आवृत्तीनंतर ही गेम लवकरच लाँच होण्याची अपेक्षा आहे.


काही वापरकर्त्यांना मिळाली संधी 
बीटा आवृत्तीमध्ये केवळ निवडक युजर्सलाबीटा टेस्टिंगची संधी मिळते. गुगल प्ले स्टोअरच्या मते बीटा व्हर्जन वापरणाऱ्यांची संख्या पूर्ण झाली आहे. त्यानंतर बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची बीटा टेस्टिंग रिक्वेस्ट बंद केली गेली आहे. याचा अर्थ असा आहे की हा खेळ यापुढे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही.


लाँच होण्यापूर्वी दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टनने आपल्या सपोर्ट पेजवर एक अपडेट जारी करुन या खेळाच्या अटींविषयी सांगितले आहे. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी खेळाडूंना या अटींशी सहमत असले पाहिजे.


गेम खेळण्याच्या या अटी असतील



  • Battlegrounds Mobile India गेमला OTP च्या सहाय्याने लॉग-इन करण्यात येईल.

  • OTP व्हेरीफाय केल्यानंतर गेम खेळता येणार.

  • प्लयेर्स व्हेरीफाय कोडला तीनच वेळा वापरू शकतात. यानंतर तो इनवॅलीड होणार.

  • एक व्हेरिफिकेशन कोड फक्त पाच मिनटं वॅलीड असेल, त्यानंतर तो एक्सपायर होणार.

  • लॉग-इनसाठी प्लेयर्स फक्त 10 वेळा OTP रिक्वेस्ट पाठवू शकतात. यापेक्षा जास्त केल्यानंतर 24 तास रिक्वेस्ट बॅन केली जाईल.

  • प्लेयर एक मोबाइल नंबरवर मॅक्सिमम 10 अकाउंट रजिस्टर करु शकतो.