मुंबई : भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी मायक्रोमॅक्सने आपला नवा स्मार्टफोन कॅनव्हास फायर 5 लॉन्च केला आहे. संगीतप्रेमींसाठी खास फीचर्स या स्मार्टफोनमध्ये आहेत. या स्मार्टफोनला फ्रंट फायरिंग 3D साऊंड इनव्हेसमेंट स्पिकर आहेत. 6 हजार 199 रुपये या समार्टफोनची किंमत ठेवण्यात आली आहे.

  

मेटल फ्रेम असणारा हा स्मार्टफोन शँपेन गोल्ड, सिल्व्हर, ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कॅनव्हास फायर 5 मध्ये ग्रॅव्हिटी कॉलिंग फीचरही देण्यात आला आहे. कोणत्याही बाजूने यूझर्स फोन करु शकतात.

 

कॅनव्हास फायर 5 स्मार्टफोनचे फीचर्स:

  • 5 इंचाचा डिस्प्ले

  • 1070 पिक्सेल रिझॉल्युशन

  • 3GHz क्वार्डकोर मीडियाटेक प्रोसेसर

  • 1 जीबी रॅम

  • 16 जीबी इंटरनल स्टोरेज

  • 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा

  • वाय-फाय

  • ब्लूटूथ

  • 3 जी

  • ड्युअल सीम स्लॉट

  • 0 मार्शमॅलो ओएस

  • 2,500mAh क्षमतेची बॅटरी