मुंबई : भारतात आयफोन स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून आयफोनच्या विक्रिवर परिणाम होत असल्याने कंपनीला चीन आणि भारतात चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे 12 वर्षानंतर आयफोनच्या किमतीत घट होणार असल्याची माहिती आहे.
आयफोन कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी 2007 मध्ये आयफोनच्या किमतीत घट करण्यात आली होती. मात्र कंपनीकडून कोणत्या देशात आयफोन स्वस्त करण्यात येणार आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पंरतू चीनमध्ये आयफोनच्या किमतीत घट करण्यात आली आहे.
कंपनीने सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या आयफोन एक्सएसची किंमत 999 डॉलर ठेवली होती. हिच आयफोन एक्सची किमत होती. अमेरिकेत या रणनीतीचा फायदा झाला. मात्र चीन, भारत आणि तुर्कीसारख्या देशात कंपनीला फटका बसला होता. त्यामुळे इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत डॉलरचा भार कंपनी उचलेल, असा निर्णय कंपनीने घेतला आहे.
भारत आयफोन कंपनीसाठी महत्वाचा बाजार असल्याचं कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी सांगितलं. कंपनीला भारत सरकारकडून टॅक्समध्ये सवलत हवी आहे. जेणेकरुन भारतात हँडसेट अॅसेंबलींग आणि स्टोर सुरु करता येईल, असं कुक म्हणाले. काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार भारतात 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये आयफोनच्या शिपमेंट्स 50 टक्क्याने कमी झाल्या होत्या.
एकंदरीत आयफोन कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतात आयफोनच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.
भारतात आयफोन स्वस्त होण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Feb 2019 10:57 AM (IST)
भारतात आयफोन स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून आयफोनच्या विक्रिवर परिणाम होत असल्याने कंपनीला चीन आणि भारतात चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे 12 वर्षानंतर आयफोनच्या किमतीत घट होणार असल्याची माहिती आहे.
TIANJIN, CHINA - 2016/11/08: An iPhone 7 is exhibited in an Apple Store. Because of the competition from the domestic brands like Xiaomi and Huawei, the demand for Apple's new products in China is expected to wane. (Photo by Zhang Peng/LightRocket via Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -