या पोकीमॉन गेमने अमेरिका आणि ब्रिटनच्या तरुणाईला अवघ्या दहा दिवसात सैराट केलं आहे. कँडी क्रश, मोटर रेस, अँग्री बर्ड, फाम विले आणि सुपर मारिओ सारख्या गेमने लहानग्यांपासून मोठ्यांना अक्षरश: पछाडून सोडलं आहे. त्यातच आता पोकीमॉन गो गेमची भर पडली आहे.
काय आहे पोकीमॉन गो?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या तरुणाईवर सध्या पोकीमॉन गोचं याड सवार आहे. हा गेम खेळायला एकदा सुरुवात केली की तुमच्या मेंदूचा कंट्रोल मोबाईलनं घेतलाच समजा कारण माणूस या गेमच्या विश्वातच हरवून जातो.
गेम खेळताना मोबाईलचा कॅमेरा आणि जीपीएस सुरु ठेवावा लागतो आणि पोकीमॉनला कॅमेऱ्यात कैद करावं लागतं. लोकेशन आणि मोबाईलमधल्या वेळेच्या आधारावर कुठला पोकीमॉन आपल्यासमोर येईल, हे गेमच्या अॅपकडून निश्चित केलं जातं. या गेम्सने सध्या सर्वांना आकर्षित केलं आहे.
पोकीमॉन लवकरच भारतात
गेमच्या लोकप्रीयतेमुळे पोकीमॉन गो लाँच करणाऱ्या नितांडो कंपनीचं नशिब फळफळलं आहे. बंद पडण्याच्या अवस्थेत असलेल्या या कंपनीचा शेअर 12 दिवसात 53 टक्क्यांनी म्हणजेच 95 हजारांनी वाढला आहे.
हा गेम पोकीमॉन च्या शोधात फिरायला लावतो. त्यामुळे गेमसाठी फिरताना भान हरवल्याने एकाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. तर 11 जणांना लूटल्याचं समोर आलंय. त्यामुळं गेम खेळताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
पोकीमॉन हा गेम सध्या भारतात उपलब्ध नाही. पण लवकरच भारतातही लाँच होणार आहे. त्यामुळे भारतातल्या तरुणाईला सुद्धा पोकीमॉन गो झपाटल्याशिवाय राहणार नाही.