अॅपल आयफोन 7 चे दोन व्हर्जन असणार आहेत. एका व्हर्जनचा रंग सिल्व्हर तर दुसऱ्याचा ग्रे असणार आहे, असं या व्हीडिओमध्ये सांगितलं आहे. मात्र अॅपलने आयफोन 7 चा सस्पेंस कायम ठेवत व्हिडिओमध्ये फोनची केवळ बॅकसाईड दाखवण्यात आली आहे.
काय आहे आयफोन 7 ची विशेषता?
आयफोन 7 हा अॅपलचा सर्वात जास्त स्टोरेज असणारा फोन आहे. आयफोन 7 प्लसमध्ये तब्बल 256 जीबी स्टोरेज असेल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. या व्हिडिओमध्ये आयफोनचा कॅमेरा एलईडी फ्लॅशसह असल्याचं दिसत आहे.
अॅपलचा हा सर्वात जास्त किंमत असणारा फोन आहे, अशीही माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यामध्ये वेगवेगळे व्हर्जन्स असणार आहेत. मात्र 256 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हर्जनची किंमत भारतात 71 हजार रुपये असेल, असं बोललं जात आहे.
पाहा व्हिडिओः