मुंबई : फोनपे (PhonePe) UPI अॅपने डिसेंबर महिन्यात गूगलपेला (Google Pay) मागे टाकलं आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फोनपेने डिसेंबरमध्ये जवळपास 1,82,126 कोटी रुपयांचे 90.20 कोटी व्यवहार केले. या व्यवहारांसह फोनपे नंबर वन यूपीआय अॅप बनलं आहे. फोनपे वॉलमार्टच्या मालकीची एक डिजिटल पेमेंट कंपनी आहे. गूगलपे दुसर्या क्रमांकावर आलं आहे.
गुगल पेवर जवळपास 1,76,199 कोटी रुपयांचे 85.44 कोटी व्यवहार झाले आहेत. डिसेंबर महिन्यात एकूण व्यवहार 2234.33 मिलियन व्यवहार झाले आहेत. आकडेवारीनुसार, दोन्ही कंपन्यांचे 86 टक्के यूपीआय व्यवहार झाले आहेत. ज्यामध्ये एकूण 4,16,176 कोटी रुपयांचे व्यवहार झाले.
पेटीएम पेमेंट्स बँक तिसऱ्या स्थानावर
फोनपे आणि गूगलपे एकत्र केल्यास सर्व यूपीआय अॅप्सच्या तुलनेत या दोघांचा 75 टक्के हिस्सा आहे. पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm) येथे तिसरा क्रमांकावर आहे. पेडीएमने 261.09 दशलक्ष व्यवहार केले आहेत. त्याचे एकूण मूल्य 31,299.78 कोटी रुपये आहे. तर मार्केटमधील हिस्सा 11.7 टक्के आहे.
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील अॅप्स
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, एकूण व्यवहाऱ्यांच्या बाबतीत अॅमेझॉन पे (Amazon Pay)चौथ्या क्रमांकावर आहे आणि भिम अॅप (Bhim App) पाचव्या क्रमांकावर आहे. डिसेंबरमध्ये अॅमेझॉन पेने जवळपास 3508 कोटी रुपयांचे 40.53 मिलियन व्यवहार केले. तर भिम अॅपने जवळपास 7748 कोटी रुपयांचे 24.80 मिलयन व्यवहार केले.