मुंबई : चीनमधील स्मार्टफोन कंपनी फीकॉमने Clue 630 स्मार्टफोन भारतात लॉन्च केलं आहे. 4G सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनची किंमत फक्त 3 हजार 999 रुपये आहे. फीकॉम Clue 630 स्मार्टफोन एक्स्क्लुझिव्हली ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

 

हे स्मार्टफोन्स 1800MHz (Band 3) आणि 2300MHz (Band 40) एलटीई बँड्सना सपोर्ट करतात. या बँड्सचा वापर भारतात 4G सर्व्हिस देण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे भारतातील 4G सेवा देणाऱ्या कंपन्यांना फीकॉमच्या स्मार्टफोनची मोठी टक्कर असेल.

 

 

फीकॉमने Clue 630 स्मार्टफोनचे फीचर्स :

  • 1GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 चिपसेट प्रोसेसर

  • एड्रेना 304 जीपीयू इंटिग्रेटेड

  • मल्टिटास्किंगसाठी 1 जीबी रॅम

  • 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज

  • एसडी कार्डच्या सहाय्याने 64GB स्टोरेज वाढवण्याची सुविधा

  • 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 4G, 3G सपोर्ट

  • जीपीआरएस

  • वाय-फाय

  • यूएसबी

  • ब्लूटूथ

  • 2300mAh बॅटरी क्षमता