मुंबई : व्हॉट्सअप ग्रुपवर आता कोणत्याही यूजरला परवानगीशिवाय अॅड करता येणार नाही. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून अशा प्रकारचं फीचर आणण्याविषयी सांगण्यात आलं आहे, ज्यात ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी संबंधित यूजरची परवानगी घेणं बंधनकारक असेल.
भारतातील व्हॉट्सअप यूजर्सना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. कारण तुमच्या इच्छेविरोधात आता कुणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. केंद्र सरकारने व्हॉट्सअपला अशा प्रकारचं फीचर डिझाईन करायला सांगितलं आहे, ज्यात यूजरची सहमती घेणं आवश्यक असेल.
सध्या कोणत्याही यूजरला व्हॉट्सअपमध्ये अॅड करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या इच्छेविरोधात ग्रुपमध्ये अॅड केलं जातं. ग्रुप का सोडला या कारणावरुन हल्ले झाल्याचे प्रकारही समोर आले होते.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता व्हॉट्सअप ग्रुपवर परवानगीशिवाय अॅड करता येणार नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Dec 2018 05:44 PM (IST)
व्हॉट्सअप ग्रुपवर आता कोणत्याही यूजरला परवानगीशिवाय अॅड करता येणार नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -