Cheapest Smartwatch: Pebble ने आपली नवीन स्मार्टवॉच लॉन्च केली आहे. कंपनीने या स्मार्टवॉचला Pebble Spark असे नाव दिले आहे. पेबल स्पार्क स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. याबाबत कंपनीचा दावा आहे की, विना चार्ज करता ही स्मार्टवॉच 5 दिवस सुरू राहील.
किंमत
Pebble Spark ची विक्री केवळ ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टद्वारे केली जाईल. आजपासून ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही स्मार्टवॉच 1,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लू, चारकोल आणि डीप वाईन कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
फीचर्स
Pebble Spark स्मार्टवॉचमध्ये 1.7-इंचाचा स्क्वेअर डायल आहे. या घड्याळात फुल-एचडी 240x280 पिक्सेल रिझोल्यूशन देण्यात आला आहे. Pebble Spark मध्ये वन-टॅप व्हॉईस असिस्टंट आणि फाइंड माय फोन यासारखी अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आली आहेत. ही स्मार्टवॉच वजनाने हलकी असून याचे वजन फक्त 45 ग्रॅम आहे. पेबल स्पार्कमध्ये इनबिल्ट मायक्रोफोनही देण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही स्मार्टवॉचद्वारे कॉलचे उत्तर देऊ शकता. यात सायकलिंग, धावणे, टेनिस आणि बॅडमिंटन यांसारखे अनेक क्रीडा फीचर्स देण्यात आले आहेत.
याशिवाय Pebble Spark मध्ये इनबिल्ट स्ट्रेस मॉनिटरही देण्यात आला आहे. याच्या मदतीने वापरकर्ते एकूण जीवनशैलीवर लक्ष ठेवू शकतात. यामध्ये अनेक प्रोफेशनल मोडही देण्यात आले आहेत. यात स्टेप काउंटरमध्ये एक फीचर देखील देण्यात आले आहे. हे वापरकर्त्यांना तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यास मदत करेल. पेबल स्पार्कमध्ये 180mAh बॅटरी देण्यात आली आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे की, ती सतत 5 दिवस काम करते. याची बॅटरी स्टँडबाय मोडवर 15 दिवस टिकू शकते.